काँग्रेस नेते राजू झोडे यांनी दिली भेट
भाग्यश्री हांडे महिला जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- साई तंत्रशिक्षण तथा साई अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण संस्था येथे कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनि बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान आज गुरुवारी काँग्रेसचे नेते तथा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आंदोलन स्थळी भेट देत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या लक्षात घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मागील अनेक वर्षांपासून साई तंत्रनिकेतन येथे शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.मात्र त्यांचे नियमित वेतन होत नाही.तर शासन निर्णयनुसार त्यांना वेतन मिळत नसल्यान त्यांना आर्थिक परिस्थिती चा सामना करावा लागत आहे. त्यामुळं शासन निर्णय नुसार वेतन मिळावा, महागाई भत्ता देण्यात यावा, शासकीय पदोन्नती देण्यात यावी, भविष्य निर्वाह निधी निधी देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन सुरू असून या आंदोलनाला काँग्रेस नेते राजू झोडे यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. यावेळी बाबूभाई अंसारी पंचशिल तामगाडगे अनुरूप पाटिल प्रफुल्ल मेश्राम आदि लोक उपस्थित होते .

