भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे.
अश्यातच अनेक वर्षापासून कांग्रेस पक्षाच्या माध्यमतुन कामगार आंदोलनातुन राजकारणात उतरलेले राष्ट्रीय मजदूर कांग्रेस (इंटक) चंद्रपुर जिलाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य S.T वर्कर्स कांग्रेस इंटक (रा. प.) चे चंद्रपुर विभागीय अध्यक्ष प्रवीण लांडगे यांनी कांग्रेस पक्षातर्फे चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात दावेदारी सादर केली आहे.
त्यांनी प्रदेश कांग्रेस कार्यालयात विधानसभेसाठी अर्ज सादर केला आहे.
प्रवीण लांडगे बद्दल
राष्ट्रीय मजदूर कांग्रेस (इंटक) चंद्रपुर जिलाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य S.T वर्कर्स कांग्रेस इंटक (रा. प.) चे चंद्रपुर विभागीय अध्यक्ष प्रवीण लांडगे तथा विजय क्रांति कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष कांग्रेस चे पदाधिकारी आहेत.

