जिल्हा प्रतिनिधी धुळे सतिष पवार ९५२७७९९३०४ धुळे – दि.०५/१०/२०२४ -फॅमिली इंटेरियर तर्फे आयोजित डिझाईन प्रदर्शना प्रसंगी इंटिरियर आणि डिजाइन पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. ४ ऑक्टोंबर रोजी महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे येथे करण्यात आले. आर्किटे्चर संजय पाटील (नाशिक) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आर्किटे्चर किरण कलंदाने, अंजली कलंदाने, अश्विन लवेकर, अंजली लवेकर, शोभा घोपटकर, रवी गद्रे, विष्णू भेडा, प्रकाश चांडक, इकबाल चैनी, विकास भंडारी यांना लेजंड आणि आयकॉन पुरस्कारांचे सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्र, शाल आणि भेट वास्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.४ ते ६ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे (राजाराम पुलाजवळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे एकूण ९० स्टॉल लावण्यात आले आहेत. उर्वरित दोन दिवस देखील पुणेकर मोठया संख्येने भेट देतील असा विश्वास आयोजक व फॅमिली इंटेरियर चे मितेश पतंगे यांनी दर्शवला.प्रदर्शनाच्या ठिकाणीच आर्चक्रांतीने तयार केलेले वेगवेगळे आर्च वास्तू बांधकाम कलेतील युनिक डिझाईन देखील अनुभवता येणार आहे. बांबूनी तैयार केलेले पेशवाई पगडी आकारातील प्रवेश द्वाराने सर्वांचीच मने आकर्षित केली.यंदाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन इंटरियर क्षेत्रातील नऊ दिग्गज स्त्रीशक्तीच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक फॅमिली इंटेरियर चे प्रमुख मितेश पतंगे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैष्णवी भाऊसा यांनी केले .

