आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलिसांना दिले निवेदन

0
214

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – दि. 05/10/2024 आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आज चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौक परिसरात होत असलेल्या अनधिकृत वाहन पार्किंगबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. श्री. राजकुमार नगराळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात ओला शोरुम, डॉमिनोस, मान मनुहर हॉटेल आणि महालक्ष्मी आईस्क्रीम समोरील मेन रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

निवेदनात वाहतूक कोंडी, अपघाताचा वाढता धोका, पादचाऱ्यांची गैरसोय आणि आपत्कालीन वाहनांच्या मार्गातील अडथळे या प्रमुख समस्यांचा उल्लेख करण्यात आला. या समस्यांवर मात करण्यासाठी संबंधित परिसरात “नो पार्किंग झोन” घोषित करणे, अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणे, नियमित गस्त घालणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशा उपाययोजनांची मागणी करण्यात आली.

या वेळी आम आदमी पार्टीचे खालील पदाधिकारी उपस्थित होते राज नगराळे जिल्हा सचिव, योगेश गोखरे महानगर अध्यक्ष, ऍड. तब्बसूम शेख महानगर महिला अध्यक्ष, अलंकार सावळकर महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष, स्वप्नील घागरगुंडे महानगर महासचिव, सुधीर पाटील महानगर सचिव, कुणाल शेठे, जितेंद्र भाटिया, याशिवाय पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते. शिष्टमंडळाने वाहतूक पोलिसांकडून या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here