सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक नेताजी चौक बाबूपेठ चंद्रपूर येथे दि. 3 ऑक्टोम्बर रोजी शरदोत्सवाची स्थापना मोठ्या उत्साही वातावरणात झाली.
मंडळाचे अध्यक्ष अमोल सुरेशराव नालमवार यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारीनि झालेली असून यात श्रीकांत ताटपल्लीवार, उल्हास कुणारपवार, श्रीकांत करीया, नरेश वारुलवार, राजेंद्र अल्लाडवार, मदन दोनेवार, राजू कृष्णापुरकर, वश्री योगेश देहारकरव, संजय तननीरवार अनेक सदस्य गण आहेत, अहोरात्र नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे व नागरीकाशी तगडा सम्बध असलेले श्री अमोल नालमवार याचे मुळे अनेक दानशूर व्यक्ती वर्गणीत व महाप्रसादास सहकार्य देतात,भव्य व दिव्य विद्युत दिव्याची रोषणाई व भव्य महाप्रसाद हे या मंडळाचे विशेष वैशिष्ट्य आहे,या वर्षी दि,9 ऑक्टोबर रोजी महाप्रसाद असून 14 ऑक्टो रोजी देवी विसर्जन आहे,10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात असख्न्य महिला सोबत बालके सुद्धा कठोर परिश्रम करूनसहभागी होतात,अत्यन्त आनंदी, उत्साही व शांततामय वातावरणात कार्यक्रम पार पडतात.

