ईगतपुरी प्रतिनिधी- विधानसभा निवडणुक जस जशी जवळ येत चालली आहे, तस तशी राजकिय वर्तुळात अंतर्गत घडामोडीनीं वेग घेतला आहे.दरम्यान ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेस व उ.बा.ठा.शिवसेना या दोन्ही गटानीं दावा ठोकल्याने चुरस वाढली आहे. दोन्ही पक्षानीं यासाठी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणीस प्रारंभ केला असुन मातोश्री व दिल्ली दरबारीही थेट साकडे घालण्यात आले आहे.
कॉंग्रेस पक्षाचा ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जातो आहे.पण कॉंग्रेस च्या दाव्याला शिवसेनेने आव्हान दिले असुन हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा ठोकला आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सौ.निर्मला गावित यांना पराभुत करण्यासाठी पक्षाचे जोडे बाजुला ठेऊन सगळेच सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. खुद्द स्वपक्षीयानीं उमेदवार आयात करुन लादल्याबद्दल नाराज होत स्व पक्षाचे उमेदवारास धोका दिला होता.अशा प्रतिकुल परिस्थितितही सौ.निर्मला गावित यांनी सन २०१४ मधील मताधिक्क्याइतकेच तब्बल ५५ हजार मते घेतली होती.एकास एक लढत झाल्याने कांग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता.पण हा विजय कॉंग्रेसचा नव्हे, तर तो गावित विरुद्ध सामुहिक विरोधक एकत्र आल्याने सुकर झाला होता.
या विजयामागे कॉंग्रेस, रा.कॉं.,कम्युनिष्ठ, शेकाप आदीसह शिवसेना या स्व पक्षातील काही लोकानींही गद्दारी केली होती. भाजप शिवसेना युती असतानांही एका दिग्गज मंत्र्याच्या आदेशानेही विरोधी कारवाया केल्या गेल्या होत्या.या शिवाय सलग दहा वर्ष सौ.गावित या आमदार असल्याने एंटीइन्कम्सी चा ही फटका त्यांना बसला होता.ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने त्यांचे व शिवसैनिकाचें सुर जुळायला वेळ मिळाला नाही.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ प्रारंभी कम्युनिष्ठ व नंतर कॉंग्रेस च्या ताब्यात होता. नव्वदीच्या दशकात राम मंदीराच्या आंदोलनाने प्रभाव पडुन येथे भाजपाचाही आमदार निवडुन आला होता.पुढे भाजपकडुन हा मतदारसंघ हिसकावण्यात कांग्रेस यशस्वी झाली तर भाजपा शिवसेना युती होऊन पुढे ही जागा शिवसेनेला सुटली.व अल्पावधीतच कांग्रेस कडुन ही जागा शिवसेनेने हिसकावुन घेतली.व त्या पुढील निवडणुकीतही ती राखली.
सन २००९ मध्ये शिवसेना फुटुन मनसे निर्माण झाली होती. याचा फटका शिवसेनेला बसला.व ही जागा कांग्रेस ने पुन्हा परत मिळवली.सन २०१४ चे निवडणुकीत सौ.निर्मला गावित यांनी कामाच्या बळावर विजयश्री खेचली होती.हा इतिहास आहे.
दरम्यान या मतदारसंघावर शिवसेना उ.बा.ठा गटाने खणखणीत दावा ठोकल्याने संभ्रम वाढला आहे.कॉंग्रेस पक्षातही अंतर्गत संभ्रम निर्माण झाला आहे. आतील गोटातील माहितीनुसार कांग्रेस मधील काही पदाधिकारी ही या गोष्टी ला अनुकुल असल्याचा दावा केला जातो आहे.
शिवसेना सुत्राच्यां मतानुसार हा मतदारसंघ महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटणार हे जवळपास निश्चीत झाले असुन येथुन उ.बा.ठा.गटाला उमेदवारी दिल्यास शिंदे गटाचा दारुण पराभव करु.
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणूकीत उ.बा.ठा. गटाने या मतदारसंघातुन विक्रमी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्लाच असुन हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा अशी मागणी त्रंयबकेश्वर तालुका प्रमुख समाधान बोडकेपाटील यांनी केले आहे.

