गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- दुर्गा उत्सवचे औचित्य साधून निसर्ग दुर्गा उत्सव मंडळ इंदाळा जि. गडचिरोली यांनी निमंत्रितांचे कविसंमेलन इंदाळा या गावी आयोजित केले. कविसनंमेलन काय असते? याची जाणीव, किंवा कवी काय असतो हे लोकांना पटवून द्यावे या उदात्त हेतूने मंडळाचे कार्याध्यक्ष मा. जनार्धनभाऊ जेंगठे उर्फ जे. के. यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या इंदाळा या गावी घडवून आणले.
संमेलनात समाजिक, शैक्षणिक तसेच प्रेम, माय – बाप, शेतकरी अशा अनेक विषयांवर कविनी दर्जेदार रचना सादर केल्या. यात मा. प्रभाकर दुर्गे सर, मा. अपेक्षा खोब्रागडे मॅडम, मा. पुनाजी कोटरंगे, मा. रेश्मा बावणे, मा. किरण बोरुले, मा. प्रियंका ठाकरे मॅडम, मा. स्वप्नील बांबोळे, मा. सोनाली कोसे, मा. विशाल मोहुर्ले, मा. तेजस्विनी बोरकर मॅडम अशा एकूण दहा कविनी आपल्या रचनेतून लोकांची मने जिंकली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद बघता हे संमेलन असेच पुढेही होतं रहावे असे लोकांना वाटतं होते.
या कार्यक्रमाप्रसंगी मंडाळाचे अध्यक्ष मा. खुशाल जेंगठे, उपाध्यक्ष मा. संजय चौधरी, मंडळाचे सचिव तसेच गावचे सरपंच मा. मारोती जेंगठे, कार्याध्यक्ष मा. जनार्धन जेंगठे, कोषाध्यक्ष मा. सचिन जेंगठे व मंडळातील इतर मा. सदस्यांनी कार्यक्रम योग्यरित्या पार पडावे यासाठी खूप मेहनत घेतली.

