अपंग परिवाराचे अध्यक्ष दिलीप मिश्रा व शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख बंडू पहानपटे यांनी केली आहे .
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसेंनदिवस गुन्हेगारी वाढत असून आता अपंगावरही अत्याचार होत आहे. अपंग हे असाय असल्याने याचा फायदा समाजातील गुंड प्रवृत्ती लोक अपंग, मतिमंद, मुकबधिर मुली व महिलावर अत्याचार करून मोकाट फिरतात, अशा आरोपीवर कठोर शासन करून RPWD Act2016 ची त्वरित अंमलबजावणी करून अपंगांना आधार व न्याय देण्याचे काम आपल्या स्तरावर करण्यात यावे व अपंग बांधवांना भीतीमुक्त जीवन जगता यावे, याकरिता त्वरित निर्णय घेण्यात यावा.
असे निवेदन पो.उपअधीक्षक रीना जनबंधु यांना देण्यात आले. यावेळी अपंग परिवाराचे अध्यक्ष दिलीप मिश्रा, शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख बंडू पहानपटे, शिवसैनिक विवेक पाटील, अपंग बांधव कविता पुन्नावार मीना लिलारे, महेंद्र शेरकी, ओम मिश्रा , संजू गोड,महेन्द्र शेरकी उपस्थित होते.

