चार चाकी वाहनातून होणारी गांजाची तस्करी रोखली धुळे तालुका पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.

0
297

धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४)- धुळे:- दिनांक-07/10/2024 रोजी धुळे तालुका पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंबई आग्रा महामार्गावरुन वाहन क्रमांक-MH-04-GJ-3384 या वाहनातुन मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा मादक पदार्थ सोबत बाळगुन विक्री करण्याचे उद्येशाने शिरपूर कडून धुळे कडे येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली तसेच नमुद मादक पदार्थ मालाची विल्हेवाट लागु नये याकरीता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोनि श्री.अभिषेक पाटील, यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षांत घेवून मा. पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे यांचे पुर्व परवानगी घेवून त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोउनि विजय देवराम पाटील, पोकॉ-1754 रविंद्र भिमराव सोनवणे, पोकॉ-345 कुणाल सुकलाल शिंगाणे, पोकॉ-219 महेंद्र निंबासिंग गिरासे, पोकॉ-480 राकेश श्रीराम मोरे, पोकॉ-1715 राहूल रामदास देवरे, पोकॉ-473 सुरेंद्र दयाराम खांडेकर, पोकॉ-295 योगेश राजेंद्र पाटील, पोकॉ-465 राजेंद्र सुकलाल पावरा, चापोहवा-112 महेंद्र पाटील, चापोहवा-115 जयेश पाटील यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी दुरक्षेत्र समोर असलेले गतिरोधक जवळ बॅरीकेटींग करुन नाकाबंदी केली दरम्यान थोड्या वेळाने 20.05 वाजेच्या सुमारास बातमीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर गाडी क्रमांक- MH-04-GJ-3384 या वाहनास थांबवून कसुन झडती व चौकशी केली असता वाहन चालक अन्सार मुसा पठाण वय-41 रा. तुळजापूर देवी मंदीर जवळ, बुरहाननगर, अहमदनगर याचे नमुद वाहनाच्या डिक्कीत 11 किलो कोरडा गांजा 242000/- रुपये किंमतीचा व 3,00,000/-रुपये किंमतीचा स्विफ्ट गाडी असा एकुण 5,42,000/- रु किमतीचा मुद्येमाल मिळून आल्याने नमुद वाहन चालक व मिळून आलेला गांजा ताब्यात घेवून संबंधीत वाहन चालकाविरुध्द पोकों- 1754 रविंद्र भिमराव सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन नमुद गुन्हयाचा तपास पोउनि श्री. विजय पाटील करीत आहेत.
या प्रकरणी यातील वाहन चालकाने त्याच्या गाडीत मिळून आलेला गांजा कोठून आणला, कोठे घेवून जात होता व कोणासाठी घेवून जात होता याचा वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here