वडसा विश्रामगृहात “आझाद” चीं बैठक
देसाईगंज (वडसा) प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : येथील स्थानिक रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पक्षाच्या आरमोरी विधानसभेतील मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक 07 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली.
आरमोरी विधानसभेत निवडणूक लढविण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची भूमिका व नियोजन करणेकरीता आरमोरी, वडसा, कुरखेडा व कोरची येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सहविचार बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वानुमते गडचिरोली पाठोपाठ आरमोरी विधानसभेत सुद्धा उमेदवार उतरवून ताकदीने लढण्याचा निश्चय करण्यात आला.
आरमोरी विधानसभेतील 4 ही तालुक्यात आझाद समाज पक्षाच्या कार्यकारण्या झालेल्या आहेत आणि सांसद चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात मोठा प्रतिसाद सुद्धा पक्षाला मिळत आहे. आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जुडत आहेत. जिल्ह्यात समाजाच्या प्रश्नांना, समस्यांना घेऊन काम करताना कोणताही उमेदवार किंवा पक्ष सध्या दिसत नाही. केवळ पैशाच्या जोरावर निवडणूकी पुरता धावणारे उमेदवार काँग्रेस, भाजपा सारख्या पक्षाकडे आहेत. निवडणुकीत पैसा लावून जिंकल्यानंतर केवळ खर्च केलेले पैसे काढण्या पलीकडे अशा उमेदवारांचा कार्य नसतो. आणि प्रस्थापित पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट न देता पैशाच्या भरोशावर निवडणूकी पुरता आलेल्या उमेदवारांना तिकीट देतात व निवडणूक झाली की ते उमेदवार घरी बसतात. त्यामुळे जनतेने समाजासाठी संघर्ष करणाऱ्या नव्या दमाच्या उमेदवारांना यावेळी सहकार्य करून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा उभा करावा. असे आवाहन आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले आहे.
दरम्यान महाराष्ट्र टुडे न्यूज व आदिवासी जनता वृत्तपत्राचे संपादक जगदीश कन्नाके यांची आझाद समाज पार्टी आदिवासी आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी तर गडचिरोली सुपरफास्ट चे संपादक दिनेश बनकर यांची गडचिरोली जिल्हा सह सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
सदर बैठकीला पक्षाचे कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीजी सहारे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, युवा नेते राहुल कुकुडकर, आदिवासी विकास परिषदे चे अंकुश कोकोडे, आरमोरी तालूका प्रभारी गोवर्धन धोटे, सचिव सुरेंद्र वासनिक, शहराध्यक्ष नितीन भोवते, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, वडसा तालुकाध्यक्ष बबन रामटेके, सचिव करण डोंगरे, महिला अध्यक्ष सपना मोटघरे, वडसा युवा आघाडी अध्यक्ष हेमंत मेश्राम, आरमोरी युवा अध्यक्ष शुभम पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे, कुरखेडा युवा अध्यक्ष रोहित कोडवते, प्रीतम बनकर आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

