राज्यसभा खासदार मान. चंद्रकांत हंडोरे यांचा उपस्थिती
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज- चंद्रपूर : दिनांक 13 ऑक्टोबर भिमशक्ती जिल्हा चंद्रपूर तर्फे भिमशक्ती कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती भिमशक्ती संस्थापक अध्यक्ष, माजी सामाजिक न्याय मंत्री, विद्यमान राज्यसभा खासदार मान. चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले कि या देशाची लोकशाही वाचवन्यासाठी निधर्मी पक्षासोबत राहिले पाहिजे ही भीम शक्ती संघटनेचची भूमिका असुन महिलांवरील अन्याय अत्याचारविरुद्ध खंभीरपने लढण्याकरिता भीम शक्ती संघटना सक्षम आहे,दलित आदिवासी ओबीसी सह इतर समाजासोबत नेहमीच भीम शक्ती असेल, मी समाज कल्याण मंत्री असताना ओबीसी, एस सी, एस टी चा विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये वाढ केले, रमाई घरकुल योजना आणली, बार्टी, महाज्योती या संस्थेना कधी निधीची कमी पडू दिली नाही.
आजची परिस्थिती या दहावर्षाचा बीजेपी कार्यळालात खूप विपरीत झाली आहे कारण आज समाजकल्याणचा व बार्टी, महाज्योती चा संपूर्ण निधी हा लाडक्या बहीण योजने साठी वापरण्यात येत आहे. असे भीम शक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांतजी हंडोरे म्हणाले. ते चंद्रपूर जिल्हा भीम शक्ती संघटना वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलत होते. खासदार हंडोरे पुढे म्हणाले की, मी मंत्री असतेवेळी चंद्रपूर येथे पहिले सामाजिक न्याय भवन उभे केले असुन महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विध्यार्थी उच्यशीक्षितित झाला पाहिजे यासाठी शभर निवासी शाळा व वसतिगृह निर्माण केली, तसेच बेरोजगार तरुण हे उद्योजक झाले पाहिजे या करिता प्रत्येकी सात कोटीच्या साडेचारसे औदेगिक सहकारी संस्था सामान्य कार्यकर्त्यास देऊन त्यांना मोठे उद्योजक मी तयार केले आहेत असे हंडोरे यांनी सांगितले. विदर्भ दौऱ्यावर असलेले खासदार चंद्रकांत हंडोरे हे नागपूर दिक्षाभूमी येथील भीम शक्ती वतीने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळा संपन्न होताच आज चंद्रपूर जिल्हा भीम शक्तीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी भीम शक्ती युवक संघटनेचे जिल्हाधक्ष पियुश धुपे,भिमशक्ती विदर्भ उपाध्यक्ष ऍड.शाम खंदारे, जिल्हाधक्ष कुणाल गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष एन डी पिंपळे, नेते महाबोधी पुनवटकर, महिला पदाधिकारी सरोज पुनवटकर, प्रा अपेक्षा पिंपळे, प्रिया जांभूळकर, रोशन जांभूळकर, दिनकर ओंकार, हौसराज मेश्राम, विजय मेश्राम, शशिकांत बनसोडे, एन के कांबळे, अविनाश मेश्राम, माधुरी रामटेके, दयावंती धुपे, संघर्ष कांबळे, शशी कांबळे,धम्मशील देवगडे, प्रियंका धुपे, अमित इंगळे भाऊसाहेब सुरवाडे, प्रेम चव्हाण बाबा शंभरकर नरेंद्र जैन संजय बोरकर, यांचेसह भीमशक्तीचे अन्य पदाधिकारी व भीमशक्तीचा असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होते.

