ब्रम्हपुरी शहराचा विकासासाठी ५७.८ कोटींचा निधी मंजूर

0
59

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याला यश

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकां प्रति असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली. सदर क्षेत्राचा ना भूतो न भविष्यती असा विकास साधण्यात विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांना तोड नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या विकास कामांचा झंजावात कायम राखत ब्रम्हपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ५७.८ कोटींचा विकास निधी मंजुर करून शहराच्या विकासात नवी भर पाडली आहे.

केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष योजनेअंतर्गत राज्यांतर्गत नगरपरिषद, नगर पंचायत यांना निधी दिल जातो. याच योजनेअंतर्गत सन २०२४- २५ या कालावधीसाठी केंद्राकडून ब्रह्मपुरी शहरातील लेंडारी तलाव, कोट तलाव, जुना आठवडी बाजार , गुजरी व इतर परिसर विकासाकरिता विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा चालविला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून ब्रह्मपुरी शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या लेंडारी तलाव, कोट तलाव, जुना आठवडी बाजार, गुजरी व इतर परिसराच्या विकासाकरिता एकूण ५७.८ कोटी इतका भक्कम निधीस मान्यता मिळाली असून शहरातील सदर परिसर पूर्णतः विकसित होणार आहे. तसेच सदर परिसर पूर्णतः विकसित झाल्यास येथील नागरिक व व्यवसायिक यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आजवर कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून त्यांनी ब्रम्हपुरी शहराच्या विकासात प्रचंड अशी ऐतिहासिक भर घातलेली आहे.

तद्वतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भाग व शहरी भागातील सावली तसेच सिंदेवाही तालुक्यातही मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून संपूर्ण क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे. त्यांचा विकासात्मक दूर दृष्टिकोन व नागरिकांना उपलब्ध होऊ लागलेल्या सोयी सुविधा यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली असो विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here