महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सोबतच, वैचारिक पातळी उंचावणे काळाची गरज- चंदाताई वैरागडे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बाबूपेठ प्रभागातील एकूण बारा महिला बचत गटाची आढावा बैठक बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली, सर्व बचत गटाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,बैठकीत वर्षभरात बचत गटांनी राबविलेले उपक्रम,आर्थिक देवाण घेवाण,बचत गटात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान ,पुढे राबविण्यात येणार उपक्रम यावर सविस्तर मार्गदर्शन करताना अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी बचत गटाची स्थापना केवळ आर्थिक देवाण घेवणीसाठीच केलेली नसून महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना स्वावलंबी करून प्रत्येक महिलांचे इतरांविषयीचे विचार सुद्धा सकारात्मक असले पाहिजे, या प्रत्येक महिलांच्या विश्वासानेच हेवेदावे नसल्याने बचतगटाच्या माध्यमातून महाराष्ट्रत पहिली रणरागिणी महिला नागरी पतसंस्था स्थापन सुद्धा केली.महिलांनी एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध जोपासले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले अस म्हणता येईल,असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले
दोन सत्रात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत रणरागिणी महिला बचत गट,राजराजेश्वर, गायत्री,सखी माऊली, सहेली,महाकाली,परिवार,
सावित्रीबाई फुले,जिजाऊ,रणरागिणी, हिरकणी दामीनी इत्यादी महिला बचत गटाच्या अध्यक्षा ,वैशाली ऐसेकर , शुभांगी कंदलवार,प्रणिता हजारे स्नेहल अंबागडे, प्रियंका खणके, रजनी सातपुते, लीला बुटले, रजनी मडावी, सुवर्णा मत्ते, रेखा वैरागडे, स्नेहल बावणे,वर्षा साखरकर तसेच सर्व पदाधिकारी आणि एकूण 400 वरील महिला सदस्य उपस्थित होते.

