आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळचा निशुल्क उपक्रम
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूरच्या विद्यमाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून निःशुल्क भोजन वितरण तथा शुद्ध पेय जल वितरण संस्थेच्या स्वखर्चातून करण्यात आले. या दिवशी लाखो बौद्ध बांधव विविध जिल्ह्यातून दीक्षाभूमी चंद्रपूर येथे येत असतात, त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, यादिवशी कुणीही उपाशी राहू नये, गरजू जनतेला एका वेळेच्या जेवणाची व्यवस्था व्हावी,म्हणून निःशुल्क भोजन तथा शुद्ध पेय जल वितरण करण्यात आले.
दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते
वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, टिना उराडे, प्रिती कुळसंगे, राकेश निमसरकार आदीनी सहकार्य केला.

