ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात होणार प्रतिष्ठेची लढाई…
निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे डावपेच हाणुन पाडणार.
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ब्रह्मपुरी दि. १७/१०/२०२४:- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक ठिकाणी दिग्गज नेते उतरून विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील पुर्व भागात विविध नेते मंडळींनी आपापल्या वंशाचे , पक्षाचे उमेदवार रिंगणात ठेवून वंशाची परंपरा सुरू ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. चक्रधर मेश्राम यांना एबी फार्म देण्याची अनेक पक्षांची तयारी असुन ते नेमके कोणत्या पक्षाचे तिकीट घेऊन लढणार आहेत. हे कोडं मात्र आचार संहिता लागू झाली तरी सुटले नाही. तरीही गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक धार्मिक, उपक्रमात, साहित्य यासारख्या विविध प्रकारच्या कार्यात सहभागी असलेले चक्रधर मेश्राम हे दिनांक २६ आक्टोंबरला ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे निकटवर्तीय सुत्रांनी सांगितले. ते राजकारणात नसले तरी त्यांनी राजकीय घडामोडींचा पत्रकारिता क्षेत्रात काम करून चांगलाच अभ्यास केला आहे. नवनितच्या गाडीमधून पदव्या मिळविणाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाही की, ज़्या आरक्षणाच्या शिडीचा आधार घेऊन आपण वर आलो. त्या आरक्षणाच्या शिडी आता कापण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. जे लोकं स्वतःशीच ईमानदारीने राहु शकत नाही ते चळवळीत ईमानदार तरी कसे राहाणार. ? देशाला आणि महाराष्ट्राला सर्वात निष्क्रिय आणि असंवेदनशील गृहमंत्री देण्याचा विक्रम काँग्रेस आणि पवार गटाच्याच नावावर आहे!
ज्याने दुष्काळी महाराष्ट्राची तहान भागवली, त्याच्याच पाठीशी जनाशीर्वादाची पुण्याई राहाणार आहे .
एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपा ? अशी खेळी निवडणूक जाहीर होताच सुरू झाली आहे. महायुतीत वादाचे फटाके वाजवून’ धडाधड’ राजीनामे दिल्याचे समजते. त्यामुळे एका आमदारांची झाली हकालपट्टीही झाली होती . सामुदायिक राजीनाम्याचे मोठे अस्त्र भाजपच्या दिशेने झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे आणि गुरांचे फार मोठे नुकसान झाले आहे . परंतु अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. ही वास्तविकता आहे.
एकनाथ शिंदे यांना भाजपने सुनावले आहे एकनाथ शिंदे सेनेला दणका देण्याचा भाजपाचा मोठा डाव आहे . भाजपचे वेगळेच गलीच्छ राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. महायुतीत खळबळ उडाली आहे त्यामुळे अस्वस्थताही वाढली आहे. मग आत्ता काय….? तर देशात शांतता नांदावी यासाठी चक्रधर मेश्राम प्रयत्नशिल राहुन महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आणि सामाजिक, सर्वसामान्य माणसाला योग्य मार्गाने न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावून लढत राहाणार आहेत.

