चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची विविध खेळात राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड

0
70

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद ,चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा, तसेच राज्य स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक पाच ते सहा ऑक्टोबर २०२४ रोजी आनंद नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते यात वयोगट सतरा वर्ष आतील मुली कुमारी. सृष्टी प्रकाश बलकी हिने निवड चाचणीत खेळाचे उत्कृष्ट कामगिरी दाखवित राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत आपले नाव नोंदविले. सीबीएसई बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्लस्टर लेव्हल मैदानी स्पर्धा अतुलानंद कॉन्व्हेंट स्कूल वाराणसी (युपी) वयोगट सतरा वर्षे आतील मुली किंजल प्रेमकुमार भगत या विद्यार्थिनी ने लांब उडी या प्रकारात राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली तसेच कोल्हापूर येथे पाच ते सात सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या क्लस्टर लेव्हल मैदानी स्पर्धेत स्वीटी रमेश यादव आणि रुचिका कल्याण कुमार या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. सखी पांडुरंग दोरखंडे ,आरोही नितील रामटेके १४ वर्षा आतील मुली व जलतरण या स्पर्धेकरिता वयोगट 14 वर्षा आतील मोहित निळकंठ चौधरी आणि हिमांशू दत्तात्रय हिंगाने वयोगट सतरा वर्ष आतील मुले सी. बी. एस.ई वेल्फेअर बोर्ड सोसायटीतर्फे राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा १९ ते २१ ऑक्टोबर२०२४ रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आली होती यात महिला कुस्ती वयोगट १४ वर्षा आतील दृष्टी विनोद ताजणे हिने वजन गट ३९ किलो आतील फ्रीस्टाइल या प्रकारात उत्तम कामगिरी बजावली.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे व शाळेचे नाव लौकिक करावे. अशा शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मद्देला आणि प्रणोती चौधरी व सर्व शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here