भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 21/11/2024 रोजी पर्यंत गावात मंडई तसेच लावणी ,नाटक, तमाशे इतर कार्यक्रम अजिबात घेणार नाहीत जर नियोजन झाले असेल तर सर्व रद्द करण्यात यावे असे आदेश माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांचे असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सूचना दिलेली आहे.
करिता सर्व पोलीस पाटील यांनी आपापले गावातील प्रमुख मंडळांना सूचना द्यायची आहे. गावात दवंडी करायची आहे. परवानगी बाबत कोणीही गावाच्या पुढारी व इतर यांनी विचारले असता त्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांचे कार्यालयात परवानगी घेण्याकरिता पाठविण्यात यावे. कोणीही पोलीस पाटील त्यांना परवानगी संबंधित पोलीस स्टेशन येथे पाठविणार नाही. तसेच आचारसंहिता शिथिल होईपर्यंत कोणतेही पोलीस पाटील हे गावच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमंत्रित निमंत्रित पाहुणे सुद्धा राहणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे..
तसेच सर्वात महत्त्वाचे कोणी जरी जाणून बुजून आचारसंहितेच्या उल्लंघन करून कार्यक्रम परवानगी घेण्याची काही गरज नाही आम्ही आपले गाव लेवलवर बघू व इत्यादी विचारात असणाऱ्यांवर योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल याबाबत विशेष सूचना द्यायची आहे. आपण सर्वांनी त्यांना प्रेमाने समजून सांगायचे आहेत वरील सर्व गोष्टी आपले स्तरावर योग्य भाषेमध्ये समजण्यात यावे.
कार्यक्रमाचे नियोजन वर दिलेल्या तारखे पुढे रीतसर परवानगी घेऊनच करावे याबाबत सूचना द्यावा..
कोणतीही गंभीर समस्या/अडचण असल्यास पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन आपली अडचण दूर करावी…
तसेच आम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे ॲडव्हान्स दिलेले आहेत आता कसे रद्द करावे तसेच इतर समस्या असतील तर ते स्वतः मंडळ जबाबदार राहतील आपण त्यांना स्पष्टपणे सर्व सूचना समजून घ्यायच्या आहेत… जबरदस्ती गावांमध्ये प्रोग्राम करायला येणारे नाटक तसेच लावणी मंडळातील प्रमुख कलाकार तसेच डेकोरेशन व इतर यांचे नाव व मोबाईल नंबर सहित संपूर्ण यादी घेऊन त्यांना फोन द्वारे सूचना करायची आहे की गावात कार्यक्रमाला येऊ नये आपणावर व मंडळातील जबाबदार व्यक्ती दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी सुद्धा महत्त्वाची सूचना आगाऊ मध्ये द्यायची आहे.
व प्रत्येक पोलीस पाटील यांनी आगाऊ माहिती काढायची आहे याबद्दल वरील सर्व सूचनांची वाचन करून नोंद घ्यायची आहे. गावातील प्रत्येक घडामोडींवर फक्त पोलीस पाटीलच लक्ष केंद्रित करून पोलीस स्टेशनला माहिती देणे आपले कर्तव्य आहे.

