प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कागजनगर आज दिनांक 27/10/24 रोज रविवार ला कागजनगर तेलंगाना येथील मिराताई आंबेडकर दीक्षाभूमी येथे धम्म प्रबोधन कार्यक्रम व माता रमाई यांच्या एकपात्री नाटक संपन्न करण्यात आले..
यकर्यक्रमाचे महत्व असे की भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्षा आद.मिराताई यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 27/10/2002 या काळात कागजनगर येथे बौद्ध धम्मदीक्षा धर्मांतर कार्यक्रम पार पडला होता.त्याचाच वर्धापन दीन साजरा करण्यात आला..
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कागजनगार शाखा अध्यक्ष आद. विश्वास जगताप हे होते तर प्रमुख मार्गदर्शक पूज्य.भंते धम्मारक्षित चैत्यभूमी मुंबई, तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे संघटक आद.नेताजी भरणे,जिल्हा सचिव आद. कृषनाक पेरकावाऱ,केंद्रीय शिक्षिका आद. सपना कुंभारे, केंद्रीय शिक्षिका आद. सुजाता लाटकर,केंद्रीय शिक्षिका आद.गायत्री रामटेके, केंद्रीय शिक्षिका आद. कविता अलोने,केंद्रीय शिक्षिका आद. प्रगतीताई मेश्राम यांनी सर्वांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी कागजनगर येथील आमदार यांनी आपली हजेरी लावली व यांच्या हस्ते सन्मान चिन्हं देऊन सर्वांचे सन्मान करण्यात आले..
यावेळी समता सैनिक दलाचे लेफ्टंन्ट कर्नल आद.अशोक पेरकावार यांनी उपस्थितांना बावीस प्रतिज्ञा दिले.
यानंतर एकपात्री अभिनेत्री आद.गायात्रिताई रामटेके यांनी माता रमाई हे नाटक सादर केले.
यावेळी तेलंगाना येथील आसिफाबाड जिल्हाध्यक्ष आद. माहुळकर,तसेच जिल्हा मंचेरियाल जिल्हाध्यक्ष आद. माहोरकर हे होते.
यावेळी बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित होते..

