चंद्रपूर महानगरपालिकेच्या धोरणावर आम आदमी पार्टीचा आक्रमक आक्षेप
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज- आज आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. चपरासी कॉलनी, रामनगर येथील नागरिकांना अमृत योजनेत लावण्यात आलेले नळ अद्यापही एक थेंब पाणी देऊ शकलेले नाहीत. तथापि, महानगरपालिकेने या चपराशी कॉलनीतील नागरिकांना मनमानी पद्धतीने पाणी बिल दिले आहे, ज्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
आम आदमी पार्टीचे महानगर उपाध्यक्ष व माजी सैनिक सुनील सदभय्ये यांच्याकडे या समस्येबाबत चपरासी कॉलनीतील नागरिकांनी तक्रार केली होती. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत आम आदमी पार्टी महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्ये यांनी महानगरपालिका आयुक्तांसोबत निवेदनाद्वारे चर्चा केली.
सुनील सदभय्ये यांनी तीव्र शब्दांत बोलताना सांगितले, “अमृत योजनेचे नळ जोडले गेले तरी त्यातून पाणीच मिळत नाही. महानगरपालिका पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे, तरीही नागरिकांवर बिलांचा बोजा टाकला जात आहे. हे आम आदमी पार्टी सहन करणार नाही. येत्या काही दिवसांत या बिलांवर त्वरित ॲक्शन न घेतल्यास आम्ही चपरासी कॉलनीतील सर्व नागरिकांना घेऊन महानगरपालिकेत तीव्र आंदोलन करू.”
आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे महानगरपालिकेचे अधिकारी व प्रशासनास तात्काळ बिल रद्द करण्याची मागणी केली आहे, अन्यथा भविष्यात आंदोलनाची चेतावणी दिली आहे.निवेदन देतांनी आम आदमी पार्टी चे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसून शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्ये, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, महानगर कोषाध्यक्ष पवन कुमार, जितेंद्र भाटिया, नजमा बेघ, सुजाता देठे, समीर मेश्राम व इतर कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

