बंडखोरीचा फायदा चक्रधर मेश्राम यांना मिळणार.?
ब्रम्हपुरी प्रतिनिधी- दि.२/११/२०२४ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार उतरून आपले नशीब बलवत्तर आहे की नाही हे आजमावणार आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय पक्षांचे दिग्गज नेते उतरले असून जनतेचा नवीन चेहऱ्याकडे पाहाण्याचा कल वाढला आहे. अशातच जन जनवादी पार्टीच्या वतीने अन्याय, अत्याचारांच्या विरोधात शासन दरबारी लढा देऊन , न्याय हक्क आणि अधिकारासाठी सतत प्रयत्नशील असलेले नवनिर्वाचित उमेदवार म्हणून चक्रधर मेश्राम यांना रिंगणात उतरविण्यात आले. त्यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सेवा करण्याचे दहा वर्षे मिळाले, त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्त व्हायला पाहिजे, असे राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांचे मत आहे, वंचितचा चेहरा सर्वांना माहीती आहे.अपक्ष उमेदवार म्हणून वसंत वारजुरकरही स्पर्धेत उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीच्या बाजूने तीन आणि महाआघाडीच्या बाजुने तीन असे एकूण सहा पक्ष तयार करण्यात आले. काही कारणांमुळे आमदारांनीही पक्षाचे तिकीट घेणे अवघड झाले. यामुळे नवीन उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प जनतेच्या मनात आहे. हा संकल्प निकाल जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.

