आज लक्ष्मीचे पूजन
दिवाळी आनंदाचा सण
अंखड दिप लावूयात
महालक्ष्मीचे करू पूजन
घरदार सुशोभित करून
अंगणात सडा सारवण
दाराला लावू झेंडूचे तोरण
सुंदर रंगीत रांगोळी काढून
देव्हा-यात चौरंगावर पूजन
कलेश,रास ठेऊन करू स्थापन
नारळ,बत्तीसा,चिंरजी,लाया
आंब्याचे पाने,झेंडूची आरास लावून
दारात बांधू आकाश कंदील
घरदार प्रकाशमय होतात
लक्ष्मी सोनपावलांनी येईल
दीपाच्या झगमगाट प्रकाशात
सांयकाळी करू लक्ष्मी पूजन
शोभून दिसे घरदार,अंगण
चोहीकडे दिप प्रकाश उजळून
आकाशी फटाके आतिशबाजी होवून
अंधारमय काळोख हा असून
अंखड दिव्याची रास लावून
प्रत्येकाने आपल्या घरादारात
प्रकाशात लक्ष्मी सोनपाऊलांने येवून
दिवाळी सण साजरा करूया
आनंद,उत्साहात दीप लावून
मित्रमंडळी घरातील आपण सारे
एकमेकांना दिवाळी फराळ देवून
कवी – केशव वामनराव डफरे शिक्षक
जि.प. प्राथमिक शाळा ढगा

