निवडणूकीआंधी पहा कसा उडीन धुराया
पक्षबदल, दलबदल समदाज व्हईन घोटाया
मोका पाहिसनं पहा कशे घुसतीन सवतीच्या घरात
कोनता झेंडा हाती घ्याचा कार्यकर्ते मं कोमात
कामा पुरता मामा अन ताका पुरती आजी…. सत्ते साठी शिळीज कढी पन. .. एकदम वाटते ताजी!!
आतां “भूमी पूजनाचे लागले मस्तन गल्लोगल्ली बोर्ड…..
दोन वर्षामंधी फलक चोरीले
आस्वासनं बिचारे मंग पाच पाच वरीस कोरडं !!
तुम्ही कितीबी कोन्हाले लाडक्या म्हना… अन कितीही लागा वाही
फायदा घेना-यांयची तुफान गर्दी
मात्र मतदानाची ग्यारंटीज नही
निशान्या कोनाच्या कायबी ठेवा
जोतो सत्तेसाठी दंग
अन इकळे महागाईन लोकायच्या
जीवनाचा उडाला रंग…!!
लालूच दाखोयीसन फायदा घेयाचा,
हे फन्डे चांगले काढले..
अहो आपलेज शेपूट कापीसन छान
म्हने फुकटात “नॉनव्हेज “वाढले!!!
आता जढी तढी वाजतीन खूप देशभक्ती ची गानी तुमच्या गोठ्यातल्या डन्गऱ्या म्हशीले, म्हणतील रुपकी राणी !!
जात धरम पंथाची हळूज चारतीन गोयी आन् आमच्या जयत्या लाकडावार, त्याह्यची भाजीन पोयी!!
आता खरा हिराज निवड्याचा हॊ, कोयसे फेक्याचे दूर
तव्हाच कुढी आपल्या जीवनाले, लागीन आनंदाचा सूर!!
कवयित्री माधुरी चौधरी वाघुळदे
संभाजीनगर

