
सिंदेवाही येथील काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
गेल्या १० वर्षाच्या इतिहासात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जो विकास झाला तो क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरला आहे. अलीकडल्या निवडणूक काळात माझ्याकडे राज्यस्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.तुम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात पूर्णत्वास आलेल्या याच विकास कामांची महती सांगून क्षेत्रातील प्रत्येक गाव खेड्यातील नागरिकांपर्यंत संपर्क साधून जन आशीर्वाद प्राप्तीसाठी “मी उमेदवार’ म्हणून पुढाकार घ्या असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाने इंग्रजांची कूटनीती अंगीकारून जाती धर्मामध्ये, तेढ निर्माण करण्याचे कार्य चालवले आहे. यामुळे समाजात दरी निर्माण होत असून मानवतेची नांदी असलेल्या भारत देशात अराजतीचे वातावरण पसरले आहे. ज्याप्रमाणे आपण एकसंघ, एकजुटीने लोकसभा निवडणुकीत देशाचे पवित्र संविधान वाचविण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी समर्थपणे लढलो अगदी त्याचप्रमाणे आता या महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याच्या लढाईत आपण तन-मन धनाने झोकून देत विजयश्री खेचून आणावी. संपूर्ण देश हा महागाई बेरोजगारीने होरपळलेला आहे. राज्य सरकारचा लाडके बहीण योजना हा केवळ निवडणुकीपुरता लॉलीपॉप असुन महाविकास आघाडीची सरकार आल्यास महिलांच्या सन्मानार्थ तेलंगाना राज्यातील महालक्ष्मी योजनेच्या पार्श्वभूमीवर 2500 रुपये प्रतिमा देणार , व सोबतच महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करून राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न काळजीपूर्वक सोडविणार . माझा प्रत्येक कार्यकर्ता व तालुक्यातील ही फळी हेच माझे संपूर्ण मनगटातील बळ असून माझ्या प्रत्येक विजयाच्या व यशस्वी वाटचालीचे ते सोबती व साक्षीदार आहेत. असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सिंदेवाही काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रासह सिंदेवाही तालुक्यात क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास कामे व त्यांच्या सामाजिक कार्याचा पाढा वाचला. देत मी उमेदवार म्हणून संपूर्ण तालुक्यात एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही रत्नापूर मरेगाव येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आयोजित बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , माजी तालुकाध्यक्ष वीरेंद्र जयस्वाल, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सिमा सहारे , शहराध्यक्ष प्रीती सागरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दादाजी चौके, जिल्हा सचिव हरिभाऊ बारेकर, तूम्मे, राष्ट्रवादीचे मनोज सैनी, इब्राहिम शेख, डॉ. केशवराव शेंडे, माजी प. स. सदस्य राहुल पोरेडीवार, माजी उपनगराध्यक्ष मयूर सूचक, नगरसेवक युनूस शेख, नवरगाव सरपंच राहुल बोडने, सुशांत बोडणे, सचिन नाडमवार, श्रीकांत हेडाऊ, तथा सिंदेवाही तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बुधप्रमुख तथा सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रामुख्याने उपस्थित होते.














