prabodhini news logo
Home ठळक बातम्या युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा नाशिकमध्ये डंका

युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा नाशिकमध्ये डंका

0
149

नागभिड तालुका प्रतिनिधी सोनाली कोसे – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र भारत (रजि.) कमिटी नाशिक जिल्हा आयोजित दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय (मायको हाल) नाशिक या ऐतिहासिक स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचाचा चौथा वर्धापन दिन, पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय कवी संमेलन मोठ्या उत्साहात (डी.बी.ए.) चे संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
या बहारदार संमेलनात अति दुर्गम भागात भागातून येणाऱ्या गडचिरोली जिल्हा अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या नक्षलग्रस्त गावी वास्तव्यास असणारे युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत) यांनी देखील सहभाग नोंदवला होता. त्यांनी आपली स्वरचित कविता तमाशा: एक भयान वास्तव स्त्री जीवनावर प्रकाश टाकणारी कविता सादर करून उपस्थित मान्यवर, कवी/ कवयित्री व रसिक श्रोत्यांची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवर या त्रिरत्न सोहळ्याचे अध्यक्ष (डी.बी.ए.) चे संस्थापक मनोज जाधव, (डी.बी.ए.) च्या सह संस्थापिका, संपादिका भावना खोब्रागडे, कवीसंमेलनाध्यक्ष दंगलकार नितीन चंदनशिवे, मुख्य आयोजक श्रीधर महिरे सर (नाशिक जिल्हाध्यक्ष), कुसुम महिरे (नाशिक कोषाध्यक्ष), नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री व विचार मंचावर उपस्थित अतिथी गण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्कार 2024 देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा गडचिरोलीचे सुपुत्र युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांनी मानाचा तुरा रोवला, त्यांच्या या पुरस्काराबद्दल, त्यांच्या या सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन, नातेवाईक, साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार, गाववासीय तसेच जिल्हा वासीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here