चला खेळूया गरबा
आला मांगल्याचा क्षण
करू दुर्गेचे पूजन
येई मनाला उधाण।।१।।
रोम रोम संचारतो
मन प्रफुल्लित होते
प्रत्येकजण गरबा
पहा खेळत राहतो।।२।।
हीच भारताची शान
देश माझा हा रंगीला
रंग वेगळे जरी का
हाच भारत चांगला।।३।।
किती जाती आणि धर्म
सर्व मिळून राहती
माझा देश गुणवान
सर्व आदर्श पाहती।।४।।
असे भाषाही वेगळ्या
रंगीबेरंगी हा वेश
साडी घागरा पंजाबी
माझा आनंदाचा देश ।।५।।
रास गरबा रंगला
आले चैतन्यही घरी
गाण्याच्या तालावर
झाली बेभान नगरी।।६।।
कवयित्री कु. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

