अचानक घडल्या
कशा गाठी भेठी
निसर्गाचे हे देणे
होते हे फक्त तुझ्या माझ्यासाठी..,
चैत्र वैशाख वनव्यातील
दाहकता होती फार
नजरेची नजर भेट
यात सामावले सार….
ते अवखळून हसणे
शीळ जशी रानातील
दर्प सुगंधी मोगऱ्याचा
सुगंधी भाव ठरले मनातील..
पहिला पाऊस जोरदार
नभातील काळ्या कुठ्ठ ढगांची
भेट तुझी माझी ठरली
छान पायवाट नात्याची….
मोर थुई थुई करतो वनात
आनंदाचा तो परिहार
बरसलेल्या मनातील भावनांचा
प्रेमाचा झाला जयजयकार….
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे

