अवघे गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर//ध्रु//
रंगली रंग रंगोटी,दारी रांगोळी सुंदर.
रथ लावून तोरणे, सजली मखर.
कंठी हार,तुळशी माळा.
कपाळी चंदनाचा टिळा.
जयघोषाने गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर//१//
टाळ म्रुदुंग विना हाती.
वारकरी विठ्ठल गाणी गाती.
दिंडी चालली पंढरी
विठ्ठल उभा विटेवरी.
आला आनंदाचा पूर
जाहला विठूनामाचा गजर//२//
दिंडी चाले पाई पाई.
विठ्ठल वसे ठाई ठाई.
वारकरी हरीनामात दंग.
रंगी रंगला श्रीरंग.
पंढरपूर संतांचे माहेर.
जाहला विठूनामाचा गजर//३//
टाळघोष पडता कानी,
मुर्ती विठ्ठलाची असे ध्यानी.
रूप पाहून सुंदर, हरपली तहान भूक.
पाहे विठ्ठलाचे रूप,चरणी ठेवि मस्तक.
हरीनामाचा करतो जागर
जाहला विठूनामाचा गजर//४//
आम्ही विठ्ठलाचे वारकरी
पाई चालतो पंढरी.
महा पातके जळती,स्नान चंद्रभागेतीरी.
कर ठेवून कटेवरी,विठ्ठल उभा विटेवरी.
चरणी ठेवून मस्तक दूर झाला अंधार
जाहला विठू नामाचा गजर//५//
अवघे गरजे पंढरपूर
जाहला विठू नामाचा गजर
सौ.भारती वसंत वाघमारे
मंचर ता.आंबेगाव जि.पुणे

