पावसाचे आगमन पहिले
वसुधेच्या गळा भेटीचे.
मृदगंध वाऱ्याने पसरले
मन पुलकित झाले सर्वांचे.
वसुधा लागली आनंदे हसू
हिरवे कोंब लागले दिसू.
हिरव्या हिरव्या पानांवरती
मोतियांसम थेंब पडती.
पक्षांची भिरभिर जरी आकाशात
फांद्यांवर झाडांच्या विसावतात.
कुहूकुहू दुमदुमते अवकाशात
निसर्गाचे गाणे पक्षी गात.
शेतकरीही मनी हसला
पावसात शेतमळा भिजला.
अंकुरून येईल आता पिक
मनाचा त्यांच्या बगीचा फुलला.
डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे
ठाणे

