प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विठू नामाचा गजर

0
167

माझ्या विठूला भेटाया
दिंडी निघाली पंढरी
विठू नामाचा गजर
होतो या भूवरी //१//

आहे संताचे माहेर
त्या चंद्रभागेच्या तिरी
नामा, चौखा ,तुका, ज्ञाना
यांची भक्ती हो खरी //२//

अभंग, भारुड, गाणी
टाळ चिपळ्या संगे सारी
माऊली जय घोषात
निघे विठूची ही स्वारी //३//

ना तहानभूक, ना कशाची चिंता
घरदार सोडून निघाले वारकरी
ध्वजा वैष्णवांची घेऊनी
दुमदुमली ही पंढरी //४//

माझा विठू माय बाप
साऱ्या जगाचा पोशिंदा
बळीराजाला सुखी ठेवा
त्याची होऊ देऊ नका निंदा //५//

विठू मागणे हे आता
साऱ्या लेकींना सुरक्षित ठेवणे
आरोग्य संपदा लाभुनी
सर्वा शिक्षण मिळू देणे //६//

सौ. ज्योती पंकज लाभशेटवार..
तामसा. जि. नांदेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here