आठवे भेट मला…
आपली ती पहिली…
नजर तुझी रोखलेली…
अन् मी लाजलेली…
होई तुझा स्पर्श …
उठे मनात काहूर…
जणू पेटतो उभ्या देहात…
जसा कापूर… कापूर…
होई थर थर ओठ…
माझे हे कोवळे…
ठेवले तू जणू…
अंगार की दोन रे…
येई मंद तो सुवास…
होई जीव कासावीस…
कुठे काटा ही रुते ना…
असा कसा हा गुलाब…
उठती आवेग आवर्तनं…
गात्रांतून… स्पर्शाची…
जणू वाहते … खळाळते ….
मीच माझ्यातून…अशी…
तुझा आवेश असा की…
जणू सागर भरतीचा….
मग वेगळे कसे की झालो..
आलो बघ एक तीरा….
नको पाहुस आता तू…
रोखून असा काही
नाही राहिले मी माझी…
गेले वाहून कधीची..
उधाणलेला…. मातलेला…
खोल… दर्या होता…
तूझ्या माझ्या पिरतिचां…
तुझ्या माझ्या… पिरतीचा…
आशालता भोसले
इंदापूर, पुणे जिल्हा.

