prabodhini news logo
Home कविता आजची कविता – मतदान तुझ्या हक्काचा

आजची कविता – मतदान तुझ्या हक्काचा

0
312

जाणीव असुदे रे तुला माणसा
तुझ्या मतदानाच्या अधिकाराची
मोठमोठ्या आव्हाहनांचे घोष
हे कार्यच फसव्या उमेदवाराची

बहुतांश फिरतील प्रचार करीत
येतील तुझ्याही दारी पडत पाया
पैशांचा आमिष दाखवतील तुला
पण जाऊ देऊ नकोस तू मत वाया

दारू , मटण , पैशांच्या लालसेने
होईल बाजार तुझ्या एका मताचा
आजचा विचार करणं सोडच आता
बघ एकदा उज्वल भविष्य उद्याचा

का झालोत आपण इतके लाचार
खऱ्या खोट्याची ना राहिली जाणीव
वेळ निघून गेल्यावर पश्र्चाताप मग
भासेल खऱ्या कार्यकर्त्याची उणीव

तुझ्या मानसिकतेला ठेवून शाबूत
कर आतातरी सुटका गुलामगिरीतून
जातीधर्मांधाची जो तोडेल शृंखला
असा नेता उगवेल एका मतपेटीतून

तुझ्या किंचाळल्याने न ऐकणार कुणी
म्हणून ओळख आधी जबाबदार कार्यकर्ता
न विकता मत, घे खबरदारीने निर्णय
जो असेल नेता आपल्या सामान्यांचा कर्ताधर्ता

कवयित्री कु. सोनाली नामदेव कोसे
डोंगरगाव (नागभिड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here