
चला करुया मतदान सारे
नको वीशिष्ट कोणत्या वर्गाचा
योग्य उमेदवार निवडून देऊ
जो विचार करेल जनहिताचा
लोकशाही चे राज्य आहे
हक्क आम्हाला मतदानाचा
कुणी नका घरात राहू
कधी जय होतो एक मताचा
निवडणूकीची धामधुम संपली
आश्वासने प्रलोभने देऊन झाली
कोण पुरी करेल का विचार करू
निवडायची संधी संविधानाने दिली
सत्तेची दोरी मतदारांच्या हाती
ध्यानात ठेवायचे नेहमी
झुलवतात फसवतात त्यांना
द्यायची असते खोटीच हमी
संधी धडा शिकवायची आहे
तुमच्या निवडीवर ठाम रहा
जय सत्याचाच करू आपण
बदलेल परिस्थिती बघतच रहा
कवयित्री – गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा














