नाट्यश्री कविता स्पर्धेतील सत्तेचाळीसाव्या सत्रात मधुकर श्रावण दुफारे विजयी

0
52

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज: स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे सत्तेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी मधुकर श्रावण दुफारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “अंगण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
श्री मधुकर श्रावण दुफारे हे चिखलगाव ,ता‌ ब्रम्हपुरी (जिल्हा – चंद्रपूर) येथील नवोदित कवी असून अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी शंभरच्या वर कवितांचे लेखन केले आहे. ते नाट्यकलावंत देखील आहेत. नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भातील रानफुले’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सत्तेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने, माधुरी अमृतकर, गणेश रामदास निकम, तुळशीराम उंदीरवाडे, पी.डी.काटकर,पुनाजी कोटरंगे, रोहिणी पराडकर, सौ. शैला चिमड्यालवार, प्रा. पंढरी बनसोडे, संगीता ठलाल, पुरुषोत्तम दहिकर, कु. भावना रामटेके, अनुराग मुळे, प्रभाकर दुर्गे,उपेंद्र रोहनकर, राजेंद्र सोनटक्के, सोनाली रायपुरे – सहारे, मंदाकिनी चरडे, संतोष कपाले, वामनदादा गेडाम, रेखा दिक्षित, वंदना सोरते,किशोर बोरकुटे, उकंडराव नारायण राऊत, मुर्लीधर खोटेले, लता शेंद्रे, यामिनी मडावी, कृष्णा कुंभारे, मधुकर दुफारे, सुजाता अवचट, खुशाल म्हशाखेत्री, संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here