एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल प्रवेशाकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन

0
64

25 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. 25 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कुल, देवाडा मध्ये इयत्ता 6 वी, 7 वी व 9 वी च्या वर्गातील अनुशेष भरून काढण्याकरीता सद्यस्थितीत 5 वी, तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पालकांचे उत्पन्न 6 लक्ष रुपयांपेक्षा कमी असलेल्या अनुसुचित जमातीचे / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत तसेच इयत्ता 6 वी, इयत्ता 7 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांकरीता 11 ते 2 या वेळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील एकलव्य मॉडेल रेसिडिेंशिअल स्कूल, देवाडा ता. राजुरा येथे स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी सदर प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेकरिता विहित अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सिव्हिल लाईन, जिल्हा क्रिडा संकुलाच्या मागे, चंद्रपूर येथे व या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेले सर्व शासकीय आश्रमशाळा व शासकीय आदिवासी मुला/ मुलींचे वसतीगृह येथून प्राप्त करून घ्यावे. तसेच अद्यावत माहिती भरलेले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसोबत वरिलप्रमाणे नमुद ठिकाणी 25 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावे. नमुद दिनांकानंतर अर्ज स्विकारले जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here