प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर: दिनांक २५ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र आयोजित ” भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण” या उपक्रम विषयाला जवळपास १२१ साहित्यिकांनी सहभाग नोंदवून आपल्या कवितेतून आणि लेखाच्या माध्यमातून संविधानाचे महत्व ,संविधानाचे जतन करणे त्याचे संरक्षण अतिशय आवश्यक आहे. संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपले अधिकार आणि कर्तव्ये तसेच मूलभूत मूल्यांची माहिती मिळते.तसेच याच आधारावर आपल्याला समाजात सन्मानाने जीवन कसे जगता येईल याचा प्रामुख्याने उल्लेख अनेक साहित्यिकांनी आपल्या अतिशय प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण रचना सादर केल्या.या विषयाला महाराष्ट्रातील सर्वात अधिक सहभाग नोंदविणारा साहित्य समूह म्हणून नावलौकिक मिळविला असून अव्वल स्थान मिळविले आहे.
सहभागी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर ,समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके ,समूह कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण ,समूह निरिक्षिकामाला मेश्राम ,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार केले असून त्यांच्या पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

