prabodhini news logo
Home नागपूर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ (भारत) तर्फे संविधान दिन मोठ्या उत्सवात साजरा

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ (भारत) तर्फे संविधान दिन मोठ्या उत्सवात साजरा

0
119

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 26/11/2024 रोजी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ भारत, चे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉल, लष्करी बाग नागपूर, महाराष्ट्र येथे उत्साहात संपन्न झाले.
या अधिवशनासाठी भारतातील 12 राज्यातील वकील मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे माजी न्यायाधीश चांद्रिकापुरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड बी. एम. सिंह , (अध्यक्ष डॉ आंबेडकर अधिवक्ता संघ भारत) यांनी भूषवले.
कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड आनंद राऊत, सचिव ॲड संदीप शेंडे, ॲड प्रवीण गायकवाड, व जिल्हा संयोजक ॲड अस्मिता तिडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. ॲड नरेंद्र गोंडाने,ॲड प्रिया मेश्राम, ॲड कंचन वराडे,ॲड प्रवीण गजवे, ॲड विजया बागडे, ॲड योगिता रामटेके, ॲड ज्योती वालदे, ॲड एम आर खान, ॲड कुतुबु जाफर, ॲड अभय पाणबुडे, ॲड सोनाली तराळे,ॲड जिजाबाई वाहने, ॲड बिंदिया अंबादे, ॲड छायादेवी यादव ॲड अब्दुल राझिक, ॲड. अल्ताफ पटेल, ॲड.अर्चना डोंगरे, अडव संतोष चव्हाण, ॲड प्रतीक कुमार, इत्यादी मंडळींनी उपस्थित राहून सहभाग दिला.
ॲड. एल. के. वर्मा, अलाहाबाद, ॲड. सी. बी. आदिम झांसी, ॲड बिछोलिया, ग्वाल्हेर;ॲड मनोजकुमार दास बिहार, अशी विविध राज्यातील मान्यवर वकील मंडळी उपस्थित होते.
अत्यंत जोषपूर्ण वातावरणात संविधान दिन साजरा करून राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.

सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here