प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – 26 नोव्हेंबर 2024 रोजी, आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने भारतीय संविधान दिन व आम आदमी पार्टी स्थापना दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महानगर अध्यक्ष श्री. योगेश गोखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चर्चा केली. यावेळी आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासूनच्या 12 वर्षांच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. पक्षाचा भ्रष्टाचारविरोधी लढा, पारदर्शक प्रशासनाची बांधिलकी व सामान्य माणसाच्या प्रश्नांवर काम करण्याचा कटिबद्ध दृष्टिकोन यावर जोर देण्यात आला.
महानगर अध्यक्ष योगेश गोखरे म्हणाले,
“भारतीय संविधान ही आपल्या देशाची ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान केवळ कायद्यांचा संच नाही, तर लोकशाही मूल्यांचे मार्गदर्शक आहे. आम आदमी पार्टीचा प्रवास देखील या लोकशाही मूल्यांवर आधारित आहे.”
वरिष्ठ नेते सुनील मुसळे म्हणाले,
“आम आदमी पार्टीने गेल्या 12 वर्षांत आपल्या कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण केला आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्यापासून ते जनतेच्या समस्यांवर काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत एक संदेश पोहोचवला आहे. चंद्रपूरच्या जनतेनेही याला मोठा प्रतिसाद दिला आहे.”
जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले,
“आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्यात लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांवर आधारित काम करणे हे आमचे प्राधान्य आहे.”
जिल्हा युवा अध्यक्ष राजू कुडे म्हणाले,
“युवा कार्यकर्त्यांमध्ये संविधानाच्या मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. संविधान दिन हा केवळ सण नाही, तर आपल्या अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. युवांनी संविधानाच्या आदर्शांवर चालून देशाचा विकास साधावा.”
कार्यक्रमाचे संचालन अल्पसंख्यक आघाडी महानगर अध्यक्ष जावेद सय्यद यांनी केले. त्यांनी संविधान दिन व पार्टी स्थापनादिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख,महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे व सिकंदर सागोरे, जिल्हा महासचिव संतोष दोरखंडे, जिल्हा युवा संघटन मंत्री मनीष राऊत,वाहतूक आघाडी महानगर अध्यक्ष जयदेव देवगडे,जिल्हा सदस्य परमजितसिंग सर,महानगर सहसचिव सुधीर पाटील, महानगर, उपाध्यक्ष सुनील सदभय्ये, महानगर सदस्य जितेंद्र भाटिया, सुजाता देठे, नजमा बेघ, फहीम शेख, झाखीर सय्यद, कविता ताई, करुणा ताई आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थिती होते. कार्यक्रमाने सर्व कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा व दिशा दिली.

