थोर समाजसुधारक
स्री शिक्षणाचे प्रणेते
खरे लोकनेते
ज्योतिबा….
शिक्षण हाच
जीवनाचा आहे आधार
केला प्रचार
शिक्षणाचा…
अस्पृश्यता, जातीव्यवस्था
व्हावे त्यांचे निर्मुलन
सामाजिक प्रबोधन
केले…
हौद पाण्याचा
केला खुला अस्पृश्यांसाठी
जगले लोकांसाठी
आयुष्य…
सावित्रीस शिकवले
मुलींसाठी शाळा उघडली
पहिली देशातली
भिडेवाड्यात..
सत्यशोधक समाज
धर्म, मनुष्यजात एक
एकच निर्मिक
आचारसंहिता…
थोर क्रांतीसुर्य
महात्मा ज्योतिबा फुले
सुधारक फुले
महान…
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

