अशोक कुबडे लिखित गोंडर कादंबरीला गडचिरोली येथील महामृत्युंजय उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार जाहीर

0
36

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’ या बहुचर्चित कादंबरीला गडचिरोली येथील अतिशय सन्मानाचा राज्यस्तरीय महामृत्युंजय उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनांक 15 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘गोंडर’ या कादंबरीला आजवर बावीस पुरस्कार मिळाले असून महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार हा गोंडर कादंबरीसाठी तेविसावा पुरस्कार आहे. नाभिक समाजाचे जगणं मांडणारी ही ग्रामीण बोलीभाषेतील कादंबरी वाचकांनी प्रचंड मागणी केली असून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर तसेच जपान,कॅनडा, सिंगापूर या परदेशातही ही कादंबरी पोहोचली आहे.आकाशवाणीवरील क्रमशः वाचनाने आणि विविध प्रयोगाने ही कादंबरी सर्वदूर पोहोचली असून चित्रपटाकडे वाटचाल करत आहे. कादंबरीला आजवर महाराष्ट्रातील नामवंत मुंबई येथील मराठा मंदिरचा पुरस्कार तर कादवा प्रतिष्ठानचा ‘अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार’/अहमदनगर येथील चौथे छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार/साहित्य विहार नागपूरचा पुरस्कार /अमरावतीचा विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार /नांदेड बाबुराव बागुल आणि शंकर भाऊ साठे/ सोलापूर / सांगली अशा महाराष्ट्रातील एकूण बावीस पुरस्काराने ही कादंबरी सन्मानित झाली आहे. महामृत्युंजय हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार गोंडर या कादंबरीला जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अशोक कुबडे यांचे कौतुक आणि अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here