प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – हर्षल यांच्या कम्प्युटर कीबोर्ड टायपिंग या शैक्षणिक क्षेत्रातील दोनदा जागतिक विक्रमाचा ध्यास घेत यांना यावर्षीचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सदर नामवंत पुरस्कार सोहळा दि.३० नोव्हेंबर 2024 रोजी गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हाॅलमध्ये हा ‘महाराष्ट आयकाॅन अवार्ड’चा दिमाखदार सोहळा आयोजीत केला होता.यवोव्हा यिरेचे डायरेक्टर आणी सिईओ प्रा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे, असिस्टंट कमिशनर भैय्याजी एरमे,सीनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री महेंद्र चव्हाण,सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो चंद्रपूर अधिकारी,विविध क्षेञातील नामवंत मान्यवर,सामाजिक क्षेञातील व्यक्तीमत्व तसेच आर्टिष्ट यांची विषेश ऊपस्थीती होती. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सन्माना साठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत व सन्मानाचा विशेष राज्य स्तराचराचा हा पुरस्कार सोहळा चा मान आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर येथील बाबुपेठ येथील हर्षल दिलीपराव नेवलकर यांनी आपल्या अप्रतिम कलेतून फास्टेस्ट कम्प्युटर कीबोर्ड टायपिंग या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लौकिक कार्य करून आपला नावे दोन जागतिक विक्रम नामवंत केलेले आहे.
यांच्या फास्टेस कम्प्युटर कीबोर्ड टायपिंग या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ,व वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेशन एजन्सी लंडन येथे करण्यात आलेली आली आहे.
यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था व विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थित दि.30 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सदर पुरस्कार हर्षल नेवलकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे हर्षल यांच्यावर विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे होत आहे.

