prabodhini news logo
Home कविता आजची कविता – तुझ्याविना

आजची कविता – तुझ्याविना

0
150

तुझ्याविना आयुष्याचा
काय आहे किनारा
आई पिता विना इथे
कुणाचाच नाही थारा

त्यांच्यासम प्रीत या जगात
नाही करीत कोणी
मारून ठोकून थकले ते तरी
त्यांचेच सदाकाळ राहावे ऋणी

चोर डाकू जरी असला पोर
तरी तो असतो त्यांचा लाडका
जगात ही प्रीतच अशी आहे
समजेल का माता पिता सारखा

स्वभावाने कठोर जरी असले ते
त्यांची प्रीत उमजून घ्यावे
त्यांचे शिस्तीच्या धड्यातही
जीवनाचे धडे उमजत राहावे

तुझ्याविना आई आयुष्याचे
धडे नाही देत कोणी
मुळेच शिस्तीत
रहावयाचे कोरिले मनी

कवयित्री रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here