प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पल्लवी संजय आल्हाट या सन २००२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या. सुरुवातीपासूनच अत्यंत खडतर प्रवास होता. सर्व कठीण परिस्थितीवर मात करत हा प्रवास सुरू झाला. विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे सुरू केले आणि आजपर्यंत सुरू आहे.
गरजू विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीचा दृष्टिकोन व मदतीचा हात सौं आल्हाट यांचा नेहमीच राहिला. या विद्यार्थ्यांना पाटी,पेन्सिल पासून ते दिवाळी सणाला कपडे, फराळ वाटप असा जणू छंदच जडला. हे सर्व करत असताना प्रसंगी स्वतःकडे व स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष व्हायचे. यांना स्वतःच्या पुढील शिक्षणाला वेळ देता नाही. परंतु यापेक्षाही तळागाळातील मुलांचे शिक्षणासाठी झटले . या भूमिकेतून २००२ सालापासून आजपर्यंत ज्ञानदानाचे हे कार्य सुरू ठेवले आहे.
सन २००२ ते २०२४ दरम्यान सौं आल्हाट यांच्या चार ठिकाणी बदल्या झाल्या अनेक बरे वाईट अनुभव आले. काही शाळेतील विद्यार्थी प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत चमकले. त्या त्या ठिकाणी पालकांनी सत्कारही केला. याचे सर्वोत्कृष्ट बक्षीस म्हणजे पालक आजही समोर आले तर आपल्या पाल्याबद्दल आनंद व्यक्त करतात व चांगल्या पदावर कार्यरत असल्याचे सांगतात.
सन २०१८ ते २४ पर्यंत जगताप वस्ती शाळा, केंद्र अशोक नगर तालुका श्रीरामपूर. येथे या कार्यरत आहेत. येथील पालक वर्ग व ग्रामस्थ अतिशय सुसंस्कारित असून त्यांचे चांगले सहकार्य शाळेसाठी आहे. या कालावधीत शाळेचा कायापालट झाला. शाळेत अनेक सुधारणा झाल्या. वृक्षारोपण, परसबाग, ग्रामपंचायत माध्यमातून वॉल कंपाऊंड,शाळेला रंगरंगोटी, बोलक्या भिंती, दानशूर व्यक्तीकडून पाच लाख लोकसहभाग मिळविला. नवीन टाइल्स, खेळाचे साहित्य,एल एफ डी कॉम्प्युटर, हे साहित्य लोकसहभागातून, ग्रामपंचायत निधीतून, तसेच आमदार निधीतून, मिळवले.
माता पालक मिळावे,शिक्षक पालक मेळावे, स्थानिक डॉक्टरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी, यावर भर दिला. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांना, आकाश कंदील बनवणे, विविध खेळाच्या स्पर्धा घेतल्या तसेच फराळ वाटप केला . शाळेतील सर्वच उपक्रमाच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. विदयार्थ्यांना येणे जाणे च्या सोयी साठी शाळेने स्वखर्चाने रिक्षा सुरु केली त्यामुळे विध्यार्थी उपस्थिती वाढली व पटसंख्या देखील वाढली. शासनाची सर्व उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.
सामाजिक कार्य करण्याच्या प्रेरणेतून, “प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन” संस्था स्थापन केली. ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू माता पालकांना मदत, मार्गदर्शन देखील करत आहे. साहित्यक्षेत्रात लेखनाच्या माध्यमातून, पक्षी प्राण्यांविषयी जनजागृती केली आहे. शैक्षणिक,साहित्य व सामाजिक तिन्ही क्षेत्रात योगदान दिलेले आहे . गेली सहा वर्षापासून विविध उपक्रम सातत्याने राबवून जगताप वस्ती शाळा, केंद्र अशोकनगर, तालुका श्रीरामपूर ही शाळा “उपक्रमशील शाळा” झाली आहे.
या सर्व कामकाजाची दखल घेत, न्याय प्रभात वृत्तपत्राच्या वतीने सन 2024 चे ” न्यायप्रभात शिक्षक रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार”, सौं.पल्लवी संजय आल्हाट यांना जाहीर झाला आहे.

