prabodhini news logo
Home कविता आजची कविता – प्राणज्योत

आजची कविता – प्राणज्योत

0
107

बाबा कशी आज काळरात्र झाली
नव कोटी जनतेची प्राणज्योत विझली

बालवयातच माणसामाणसात विषमता दिसली
अशी का हो ही भेदाभेद ? प्रश्न तुम्ही विचारली

शाळा शिकून मोठे होण्याचा ध्यास तुम्ही धरला
जातीभेद नष्ट करण्याचा विडा हाती उचलला

बहुजनांच्या हक्कासाठी रात्रंदिवस लढला
गुदमरलेल्या श्वासाला चंदनाचा सुगंध दिला

अंधकारात होता बहुजन समाज बुडाला
नवचैतन्य देऊन बळ दिले जगण्याला…

संविधान लिहून दिले हक् एकसमान
साऱ्या मानवजातीत फुलविला मळा वैचारिकतेतून

बाबा कशी आज काळरात्र झाली
नवकोटी जनतेची प्राणज्योत विझली

कवयित्री संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here