डॉ.गोविंद कामटे यांनी संविधान पत्रक वाटून महापरिनिर्वाण दिन केला साजरा

0
38

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क :-राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधान पत्रक वाटप करून अभिवादन करण्यात आले. परभणी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास 6 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी आठ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रजन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्यचे सल्लागार तथा पश्चिम महाराष्ट्रचे संपर्कप्रमुख डॉ.गोविंद कामटे,प्रमुख पाहुणे जिल्हापरिषदचे प्रल्हाद भराडे तसेच संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आणी बहुसंख्य भीमसैनिक उपस्थितीत होते. अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here