पुलगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भीम आर्मी वर्धा जिल्हा विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांची मागणी सदर निवेदन पोलीस स्टेशन पुलगाव द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले निवेदन देते वेळेस शहर अध्यक्ष ज्योतीताई नगरडे निखिल साखरे रोशन हिंडवे विकास कांबळे महादेवराव ओंकार कुणाल चवारे नाझीर सय्यद इत्यादी जण उपस्थित होते
भारतीय संविधान हे केवळ कोना एका विशिष्ठ जातिधर्मसाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे भारतीय संविधानामुळेच हा देश एकसंघ आहे व सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . मा महोदय असे असतानादेखील भारतीय संविधाना विषयी काही भारतीय नागरिकांमध्ये जागृती आलेली दिसत नाही महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे विशिष्ठ धर्मीयांसाठी आहे किंवा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले म्हणून काहींचा पोटशूळ उठलेला आहे असे दिसते . किंवा या देशात कायदा व सुव्यवस्था बिघडावी यासाठी काही असामाजिक घटक यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत असे परभणी येथे घडलेल्या घटनेवरून दिसत आहे .
मा महोदय , परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या महत्वाच्या जागेवरील येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यामागे सदर व्यक्तीचा हेतू काय होता यामागे कोणाचे डोके आहे ,सदर आरोपीला माथेफिरू ठरवून त्यांच्यामागील सूत्रधाराला मोकळे सोडले जात आहे काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत .
तरीही हे कृत्य करणाऱ्या व्यक्तविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या घटनेमागील सूत्रधार शोधून त्यांच्याविरोधातदेखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ,महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत . आंबेडकरी वस्त्यां मधील पोलिसानी चालविलेले निरपराध युवकांचे कॉम्बिग ऑपरेशन त्वरित थांबवावे. अटक केलेल्या निरपराध भीम सैनिकांची त्वरित सुटका करण्यात यावी, संविधानाच्या जनजागृतीसाठी राज्यभर विशेष अभियान सुरु करावे ,भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा

