चंद्रावरच्या शाळेत
उदयाला नक्की जायचे
चांदोबा गुरुजीसाठी
आपण काय काय न्यायचे।।
करून पुरण पोळी
बांधून आपली झोळी
चंद्रावर पोहचले की
वाजवू आपण टाळी।।
चंद्रावरच्या शाळेत
नसेल हं गृहपाठ
नसेल कधी मार
फक्त थाटचं थाट।।
सगळीकडे आपण
उडत उडत जाऊ
चांदोबा गुरूजीसोबत
चॉकलेट पोळी खाऊ।।
नाही कुठलेही पाढे
नाही कसलाही त्रास
गुरूजी आमचे आवडते
करून टाकतील पास।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

