खेळांतुन शारीरिक व मानसिक विकास घडतो-शाळा समिती अध्यक्ष रमेश बामनकर

0
53

छल्लेवाडा येथे केंद्रस्थरिय बालक्रीडा संमेलनात प्रतिपादन

तिरुमलेश कंबलवार गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली – खेळांतून शारीरिक,मानसिक आरोग्य सुदृढ बनतो.खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतो.बालकांनी दिवसातून एक तास खेळासाठी खर्च घालावं.खेळातुन सहनशीलता निर्माण होते.क्रीडास्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ आहे.क्रीडा स्पर्धेतून समोर जाण्याची एक मोठी संधी निर्माण होते असे प्रतिपादन निमलगुडम शाळा समिती चे अध्यक्ष तथा पत्रकार रमेश बामनकर यांनी केले.
अहेरी तालुक्यातील छलेवाडा येथे आयोजित राजाराम केंद्रास्थरिय बालक्रीडा संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सरपंच लक्ष्मी सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी रामाजी भसारकर तर विशेष अतिथी म्हणून मु. अअजय पस्पुनूरवार राजाराम चे सरपंच मंगला आत्राम,बुज्जीताई मुंजमकर,शाळा समिती अध्यक्ष संतोष सिडाम,प्रभाकर झुमडे,तिरुपती दुर्गे, राजाराम दुर्गे,मोंडी कोटरंगे,प्रभाकर चापले प्रणाली,हेमंत संभावट,निर्मला रत्नम, केंद्रप्रमुख सुनील आईचंवार आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवर आपलं मनोगत व्यक्त केले.
सदर क्रीडा संमेलनात 19 शाळेने सहभाग घेऊन 500 च्या वर विद्यार्थ्यांनी आपलं कलागुण दाखविणार.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रामदास कोंडागोर्ला प्रास्ताविक केंद्र प्रमुख सुनील आईचंवार तर आभार प्रदर्शन रघुपती मुरमाडे यांनी मानले.
या वेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अश्या झाकी सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here