जीव हा वेडा माझा
कासावीस झाला
सरिता मिळावी जशी
जाऊनी सागराला……1
मनात होती माझ्या
भेटण्याची ओढ तुला
दुराव्यात रे तुझ्या
श्वास सुटू लागला……2
कल्पनेत करीत बसली
आस मृगजळाची
सांग ना किती बघू
वाट मी मिलनाची……3
प्रत्यक्ष तू आहेस
मी अप्रत्यक्ष रे
श्वासात तू माझ्या
वाऱ्यात विरलेली मी रे……4
कवयित्री – सौ. वैजयंती विकास गहुकर
योगा टीचर, कवयत्री, जिल्हा.चंद्रपूर

