याची देही, याची डोळा, पाहिला महामृत्युंजय सोहळा

0
47

जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन खडसे.

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली च्या वतीने काल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात’महामृत्युंजय वांड्.मय पुरस्कार वितरण सोहळा’ पार पडला. या सोहळ्यात अध्यक्षीय पदावरुन बोलतांना अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक व पत्रकार यांनी वरील उद्गार काढले. तर ‘गडचिरोलीसारख्या आदिम जिल्ह्यात साहित्य पंढरी अवतरली असून साहित्याचे वारकरी गोळा झाले’ असे व प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी यतीन सामंत यांनी केले.
नाट्यश्रीच्या वतीने मराठी साहित्यिकांसाठी नुकतीच ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा’घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील एकूण ३४५साहित्यिक यांनी सहभाग नोंदविला होता. व परिक्षणाअंती ३६ साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येवून त्यांना काल गडचिरोली येथे झालेल्या विशेष व सोहळ्यात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बंगलोर (कर्नाटक) येथील सुप्रसिध्द साहित्यिक यतीन सामंत, प्रा. डॉ . मोहन खडसे (अकोला), दै. सकाळचे पत्रकार मिलींद उमरे , प्रा. डॉ . जनबंधू मेश्राम, सिंदेवाही, नाट्यश्रीचे उपाध्यक्ष दादा चुधरी व नाटककार चुडाराम बल्हारपुरे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगाचे औचित्य साधून झाडीपट्टीतील २९ कलावंत व कवींचा देखील याप्रसंगी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नाट्यश्रीचे संगीतकार विठ्ठल खानोरकर, प्रसिद्ध नाट्य कलावंत दिवाकर बारसागडे, विजया पोगडे, व तबलावादक केवळ बगमारे यांनी नांदी म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. व स्वागतगीत सादर करुन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचलन योगेश गोहणे, प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी केले. व आभार दादाजी चुधरी यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, रमेश निखारे, राजेंद्र जरुरकर,दिलीप मेश्राम, जितेंद्र उपाध्ये, वसंत चापले, संतोष गडपायले, निरंजन भरडकर, मारोती लाकडे, गजानन गेडाम, हेमंत कावळे, टिकाराम सालोटकर, चुडाराम बल्हारपुरे यांनी सहकार्य केले.

आदिवासी जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी

याप्रसंगी गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात प्रथमच मोठमोठ्या साहित्यिकांनी एकाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यात खालील प्रसिद्ध साहित्यिक आवर्जून उपस्थित होते. बंगलोर (कर्नाटक) येथून यतीन सामंत, अकोला वरुन प्रा.डॉ. मोहन खडसे, सोलापूर वरुन प्राचार्य शिवाजी शिंदे, परभणी वरुन एम. डी. इंगोले, नांदेड वरुन अशोक कुबडे, छ. संभाजीनगर वरुन डॉ. ललित अधाने, वर्धा वरुन सचिन सावरकर, यवतमाळ येथून अनंता सूर, नागपूर वरुन वर्षा किडे- कुलकर्णी, बळवंत भोयर, विशाखा कांबळे, चंद्रपूर वरुन श्याम मोहरकर, राजेंद्र मुसणे,याशिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here