राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची परभणी ला भेट

0
113

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज परभणी शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व युवा नेते रोहित पवार आले असता त्यांनी जिल्हयातील सर्व घटनांची माहिती घेतली आणि जिल्हाधिकारी गावंडे साहेब यांच्या कडून धक्कादायक माहिती समोर आली की परभणी शहरात जो लाठीचार्ज केला गेला आणि जे कोंबींग ऑपरेशन झाले या बद्दल जिल्हाधिकारी गावंडे साहेब यांना माहीतच नाही. गावंडे साहेब यांना रोहीत पवार यांनी प्रश्न केला की हा जो लाठीचार्ज आणि कोंबिग ऑपरेशन झाले हे तुम्हाला माहिती नाही त्या वर खुद्द कलेक्टर म्हणतात की मला सुद्धा माहित नाही की हे कोणाच्या सांगण्यावरून झाले. एकीकडे कायदा असा सांगतो की जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक (SP) हे सुध्दा जिल्हाधिकारी यांना विचारल्या शिवाय काहीच करू शकत नाहीत कारण जिल्हाधिकारी म्हणजे DM (District magistrate) असतात त्यांना न्यायाधीशांचा दर्जा प्राप्त असतो. मग हे कॉम्बिंग ऑपरेशन आणि लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला. याचाच अर्थ असा की या प्रकरणा मागे कोणी तिसराच आहे. म्हणजेच जिल्हाधिकारी यांना देखील विचारात न घेता गृह विभागाने संविधानाचा अपमान केला. व परभणी शहरात दंगल घडवून आणली आणि नाहक आंबेडकरी जनतेला त्रास दिला, त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सोमनाथ सुर्यवंशी व महाराष्ट्राचा ढाण्या वाघ विजय वाकोडे साहेब यांना गमावले.
आदरणीय रोहीत पवार आपण हि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आंबेडकरी जनतेला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here